निबंधलेखन | NIBANDH LEKHAN IN MARATHI

NIBANDH LEKHAN IN MARATHI

निबंधलेखन म्हणजे विषयानुरूप

केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी होय. एखादया विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे निबंधलेखन. निबंधलेखनात लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते. लेखनकौशल्याचा विकास व अभिव्यक्तीक्षमतेचा विकास हे निबंधलेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

‘निबंध म्हणजे आपल्या विचारांची सुसंगत मांडणी.” “

ही शब्दांची रचना मुद्देसूद असली पाहीजे

त्याचप्रमाणे निबंध किती मोठा लिहिलाय हे महत्त्वाचं नाही तर तो विषयाला किती धरून लिहिला आहे हे महत्त्वाचा आहे.

निबंधलेखनासाठी आवश्यक गोष्टी / क्षमता

प्रभावी भाषा

चिकित्सक

विचार

बहुश्रुतता

वाचन

निरीक्षण

कल्पना

भावना

चिंतन

शब्दसंपत्ती

आपण अनुभवलेली, ऐकलेली, एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचारप्रवृत्त करीत असतो. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल? असा विचार आपण केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषण आपण तटस्थपणे करू शकतो. 

अशा विचारांना, भावनांना, संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले, तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यांसमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखनकौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो.

प्रसंगलेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे :

(१) प्रसंगाची, घटनेची कल्पना

(२) सूक्ष्मनिरीक्षण

(३) भावनांची अभिव्यक्ती

(४) चित्रदर्शी संवेदनशील लेखन

Important points

*निबंध लेखन चित्रदर्शी असलं पाहिजे, म्हणजे ते हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे, आणि तेही मोजक्या शब्दात.

*आपल्या लिखाणातून नेमके आपल्याला काय सांगायचं हे कळले पाहिजे.

निबंध कमीत कमी तीन ते चार परेग्राफचा असला पाहिजे.

निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. निबंधामध्ये मूळ पुनरावृत्ती करू नये. विचारांची

एखाद्या विषयानुरूप कवितेच्या महत्त्वाच्या ओळी देऊन एखादा प्रसंग देऊन एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे विचार देऊन एखादी म्हण अथवा वाक्यप्रचार देऊन करता येते.

आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, वस्तुचे किंवा प्रसंगाच चित्र वाकणाऱ्यासमोर शब्दात रेखटावे लागते. त्यासाठी लिहिणाऱ्याकडे उत्तम निरीक्षणशक्ती व लेखन शैली असणे आवश्यक असते.

● अशा निबंधात प्रसंगाचे केवळ बाह्यवर्णन करणे अपेक्षित नसते तर त्या प्रसंगातून बघणाऱ्या व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या, कोणते विचार आले याचे वर्णन करणे अपेक्षित असते.

• निबंध वाचणाऱ्याच्या नजरेसमोर तो प्रसंग साक्षात उभा करण्याचे सामर्थ्य लेखनात असावे.

निबंध हा थोडक्यात व स्पष्ट स्वरूपात असे असावा.

एखाद्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणे किंवा एखांदी स्वतः अनुभवलेली घटना स्वतःच्या साध्या व सरळ शब्दात मांडणे

विचार प्रभावीपणे मांडणे आवश्यक असते विचारांना संवेदनशील त्याची व भावनात्मक त्याची जोड देणे आवश्यक असते दिलेल्या प्रसंगाला वा घटनेला धरूनच विचारांची साखळी तयार करणे गरजेचे असते

विचारांची मांडणी इतक्या सुसंगतपणे होणे गरजेचे असते की वाचकाला निबंध वाचताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर संबंधित घटना व प्रसंग दृश्यमान झाला पाहिजे

Some Topics FOR NIBANDH LEKHAN IN MARATHI

एखांदा मौलिक विचार मांडून निबंधाचा समारोप करावा तसेच निबंधाची मांडणी मुद्देसूद असावी.

माझा प्रिय मित्र.

उदा.

मी पाहिलेली जत्रा.

विभागात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर.

मी पाहिलेले निसर्ग सुंदर दृश्य.

माझे आवडते शिक्षक.

Examples OF NIBANDH LEKHAN IN MARATHI

अकस्मात पडलेला 

अकस्मात पडलेला पाऊस

आकाश स्वच्छ व निरभ्र होते. दुपारची मध्यान्हाची वेळ नुकतीच सरत आली होती. सूर्याची आग ओकण्याची तीव्रता कमी झाली होती. पण दुपारच्या उष्णतेने तापलेली जमीन आता आग ओकत होती. उन्हाच्या तीव्रतेने व्याकूळ झालेले अनेक जीव ग्लानी आल्यागत निपचित पडले होते. काही जीव असहाय उष्णतेमुळे तहानलेले होते, पाण्याच्या शोधात होते, झाडाखाली दबा धरून एकमेकांकडे टक लावून पहात होते. तर काही झाडाच्या फांदीवर बसून पेंगत होते. अनेक शेतकरी, शेतमजूर थंड सावलीत विसावले होते. निसर्गाने वाढून ठेवलेल्या संकटाची त्यांना जरासीही कल्पना नसावी.बघता बघता आकाशात काळे-निळे ढग जमा होऊ लागले होते. काही वेळातच सूर्यही दिसेनासा झाला. यावेळी कवी बा. भ. बोरकर यांच्या ओळी सहज आठवल्या.

गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले या ओळीप्रमाने अचानकच अंधारून आले होते. पशुपक्षांच्या किलबिलाटाबरोबरच थंड वायाची झुळूक येऊन गेली. पण तीच झुळूक प्रचंड सोसाट्याच्या वायाची सुरूवातच ठरली होती. हळूहळू आकाशाला गवसणी घालणान्या धुळीच्या वादळांचे लोटच्या लोट येऊ लागले. अनेकांची रंगीबेरंगी कपडे आकाशात झोके घेताना दिसू लागले होते. विविध प्रकारचे नाना विविध आवाज कानी पडत होते. वाऱ्याने रौद्र रूप धारण केले होते. विजांच्या कडकडाटासह टपोन्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. निसर्गातील एक एक क्षण

डोळ्याने टिपण्याची आमची धडपड सुरू झाली. पुन्हा पुन्हा डोळे निसर्गाचे रौद्र रूप डोळ्यात साठवत होते. जिकडे पहावे तिकडे गारांचा खच पडलेला होता. पाण्याने ST आता उताराच्या दिशेने मार्ग शोधला होता. शेतातील पिकांचे तर खूपच नुकसान झाले होते.

आता पावसाचा जोर जसा ओसरला तसा निसर्गाचे सोज्वळ रूप दिसू लागलं. आम्हीही रिमझिम पावसात भिजण्यासाठी बाहेर आलो. गारांची जमवाजमव सुरू केली. मनसोक्त आनंद घेण्यासाठी चिखलात उड्या मारल्या. आजुबाजुच्या झाडांनाही सोसाट्याचा वारा नकोसा झाला असावा. आंब्याच्या झाडाखाली केन्ऱ्याचा खच पडला. फुलांबरोबर पानांचाही सडा पडला होता. आता हे सारे विसरून झाडेही रिमझिम पावसाचा आनंद घेत होती. त्यातच सोनेरी सुर्यकिरणांनी न्हालेल्या सृष्टीचं

रूप आता नव्यानवलाई सारखं भासत होतं. सुरुवातीचा शांत निसर्ग, नंतरचे रौद्र रूप आणि आता निसर्गाचे सोज्वळ रूप. हे सारे काही वेळेच्या अंतरातील रूपं, मनाला NEMEST विचार करायला लावणारी होती. आता तेच पक्षी वादळात स्वतःला सावरण्याचा, जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते ते आनंदाने विहार करताना दिसू लागले. हे सारं माझ्यासाठी कल्पनातीत घडलं होतं.

हाच का तो लहरी निसर्ग ? कसली किमया आहे त्याची! क्षणात आपले रूप बदलतो. हे पाहून उष्णतेच्या लाटेने बेचेन झालेल्या मनाला पावसाने उल्हासित केले होते. निसर्ग काय असतो. याचं उत्तर मला मिळालं होतं. एक वेगळा अनुभव मिळाला होता. हे अविस्मरणीय क्षण मनात साठवत पुन्हा पुन्हा निसर्गाच्या बदलत्या रूपाच्या आठवणी काढत मी घरी केव्हा पोहोचलो कळले नाही.

वन More examples

एकदा मी नेहमी प्रमाणे सकाळी माझ्या मित्रांसोबत शाळेत जात होतो. मी आणि माझे मित्र गप्पा मारत चाललो होतो. शाळेत जाण्याचा आमचा नेहमीचा रस्ता. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. शाळेजवळ गेल्यावर अचानक मला मोठा आवाज ऐकू आला. काय झाले हे पाहण्यासाठी लोक धावू लागले. रस्त्यावर लोकांची खूप गर्दी जमा झाली. एका कारच्या चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले होते आणि तो विजेच्या खांबावर आदळला होता.

मी व माझे मित्र आम्ही धावत तेथे गेलो. चालक खूप गंभीर जखमी झाला होता. लोकांनी त्याला कारमधून बाहेर येण्यास मदत केली. त्यांच्या कपाळावर एक मोठी जखम झाली होती आणि खूप रक्तस्राव होत होता. गर्दीमधील एका माणसाने त्यांच्या घरातील मंडळींना त्यांच्या अपघाताची सूचना दिली व त्याला लगेच एका कारमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.ती धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला होता. जमावामधील एका व्यक्तीने पोलिसांना अपघात झाल्याचे कळवले. लगेच तेथे वाहतूक पोलिसांचे पथक आले आणि त्यांनी जमावाला दूर केले. मग त्यांनी त्यांचा तपास सुरू केला. तो एक भयानक अनुभव होता. अजूनही त्या अपघाताच्या आठवणीने थरथर कापतो.

Once more

परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती किंवा तारांबळ

मी सहाव्या वर्गात असतानाचा हा प्रसंग शाळेची प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार होती. नेहमीप्रमाणे आम्हाला परीक्षेचे वेळापत्रक मिळाले. त्याप्रमाणे आम्ही अभ्यास देखील सुरू केला. पहिले दोन पेपर छान सोडवले. त्यामुळे मी फार खुशीत होतो. मी व माझे काही मित्र आम्ही सर्वांनी शाळा सुरू झाल्यापासूनच नियमितपणे अभ्यास करायचा असे ठरवले होते. त्यामुळे शिक्षकांनी वर्गात शिकवलेल्या प्रत्येक विषयाची आम्ही दररोज उजळणी करत असू. त्यामुळे आमचा अभ्यासही बऱ्यापैकी झाला होता.

परंतु काही कारणास्तव आमची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तीन दिवसानंतर पुन्हा परीक्षा सुरु झाली. हिंदी आणि मराठी चे पेपर झाले. आम्हाला परीक्षेच्या आधी एक तास सराव करण्याकरता दिला जात असे. तेव्हा मी विज्ञानाचे पुस्तक काढून उजळणी करू लागलो, माझ्या मित्राने ते पाहिले आणि आश्चर्याने म्हणाला” अरे आज विज्ञानाचा सराव कसा काय करतोस? ” त्यावर मी म्हणालो, विज्ञानाचाच पेपर आहे ना! त्यावर माझा मित्र म्हणाला “अरे, वेडा का खुळा ? आज तर गणिताचा पेपर आहे.” मी पटकन वही काढून वेळापत्रक पाहिले. पाहतो तर काय, आज खरोखरच गणिताचा पेपर होता. आता मात्र माझी चांगलीच तारांबळ उडाली. दहा गेले आणि पाच राहिले.काय करावे काही सुचेना. परीक्षा पुढे ढकलल्याने वेळापत्रकातील 3 बदल मी व्यवस्थितपणे लिहूनच घेतला नव्हता. मनातील सर्व विचार मी बाजूला सारले आणि भराभर सर्व व्याख्या ( Definitions), सूत्रे (formulae), वाचून काढली आणि काही महत्त्वाच्या गणितांचा सराव केला. तेवढ्यात सरावाचा तास संपला.

पेपर सुरू होण्यापूर्वी देवाचा धावा केला, की ‘बाबा रे मला सर्व गणितं आठवू देत, माझा पेपर व्यवस्थित सोडवला जाऊ दे!’

तेवढ्यात आईने सांगितलेल्या वाक्याची आठवण झाली. “कुठल्याही परिस्थितीत पेपर अतिशय शांतचित्ताने सोडव, मन एकाग्र करून सोडव, आपले लक्ष विचलित होऊ देऊ नकोस.”

बस मनाशी विचार पक्का केला. आता जे होईल ते होईल, जे आठवेल ते लिहिन. आणि पेपर लिहायला सुरुवात केली. दहा मिनिटे आधी माझा पेपर पूर्ण झाला होता. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला.

माझ्या आयुष्यातला हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *